PM किसानच्या १४ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर

PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच पीएम किसानचा १४ वा हप्ता जारी करू शकते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी रोजी PM किसानचा १३ वा हप्ता जारी केला होता. याचा लाभ देशभरातील जवळपास ८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला. आता लवकरच १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

देशभरातील अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सदर योजना सुरू केली आहे. अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्टा दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

विशेष बाब म्हणजे ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो. सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. आतापर्यंत सरकारने PM किसान सन्मान निधीचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. आता सर्व लाभार्थी शेतकरी १४ व्या हप्त्याची प्रतिक्षा करीत आहेत. किसानचा १४ वा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पीएम किसान ई-केवायसी करणे अनिवार्य
केंद्र सरकारने पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी eKYC अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC अपडेट केलेले नाही, त्यांनी PM Kisan https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करा. जर E KYC पूर्ण केली नसेल तर १४ वा हप्ता खात्यावर येणार नाही. https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळे डिटेल्स पाहू शकता.