PM मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार, करू शकतात मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. CAA संसदेने मंजूर करून जवळपास पाच वर्षे उलटली आहेत, परंतु सरकारने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यावेळी सीएएला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता, त्यानंतर तो स्थगित करण्यात आला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी म्हटले आहे. हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. बांगलादेश, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचा छळ होत असेल, तर त्यांना भारतात आणून त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद असावी, असे वचन महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याच्या वेळी देशवासियांना दिले होते. ते म्हणाले, काही लोक बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे समर्थन करतात परंतु CAA ला विरोध करतात.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा एक कायदा आहे जो लागू केल्यास, डिसेंबर 2014 पर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन शेजारील मुस्लिम देशांमधून आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की त्यात गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांचा समावेश आहे – हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन. कारण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत आणि इतर सर्व धर्मामुळे अल्पसंख्याक श्रेणीत येतात.

(बातमी अपडेट होतेय )