PM Modi : अविश्वास प्रस्तावावर काय म्हणाले?

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी आज संसदेत अविश्वास प्रस्तावावर बोलत आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याबद्दल आभार मानले. देशाच्या कोटी-कोटी लोकांचे आभार मानतो. देव खूप दयाळू आहे.

तो कोणत्याना कोणत्या माध्यमातून इच्छा पूर्ण करुन घेतो. मी याला देवाचा आशिर्वाद मानतो की त्यांनी अविश्वास ठराव आणला. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

2018 ला देखील देवाचा आदेश होता. तेव्हाही अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा मी म्हटलं होतं हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही. जनेतेने पूर्ण विश्वासानं विरोधकांसाठी नो कॉन्फिडंन्स घोषीत केले.

निवडणुकीत NDA आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. 2024 च्या निवडणुकीत NDA आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा येणार असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.