World Wildlife Day : पीएम नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सासन येथील गीर राष्ट्रीय उद्यानाची सफारी करीत ‘जागतिक वन्यजीव दिन’ साजरा केला. त्यानंतर सासनच्या सिंह सदन मध्ये वन्य जीव बोर्डसोबत बैठक घेण्यात आली. या वेळी एकुण ४७ सभासद उपस्थित होते.
पीएम मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आशियाई सिंहांचे एकमेव घर असलेल्या सासन गीरच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले होते. आज देश-विदेशातून लाखो पर्यटक सासर गीरमध्ये सिंह दर्शनासाठी येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सासन गीरमध्ये राहणाऱ्या सिंहांच्या संरक्षणासाठी आणि गीरच्या समग्र विकासासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले.
त्यांनी स्वत:हा २००७ मध्ये गीर वनक्षेत्राचा दौरा केला होता आणि तेथील परिस्थितीचा माहिती घेतली होती. यानंतर मोदी यांनी गीरचा समग्र विकास, सिंहांचे संरक्षण आणि गीरच्या वन्य जीवांच्या संरक्षणासाठी त्यांनी कठोर प्रयत्न केले. अखेर आज देश-विदेशातून लाखो पर्यटक सासर गीरमध्ये सिंह दर्शनासाठी येत आहेत.