PM Modi Oath Ceremony : मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की… सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींसोबतच एनडीएच्या देशभरातील अनेक खासदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी  हजेरी लावली.

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या 6 मंत्र्यांनी केली स्वाक्षरी
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या खासदारांनाही स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पियुष गोयल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले हेही आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत.