---Advertisement---

ठरलं ! ‘या’ तारखेला पीएम मोदी गाजवणार नंदुरबारचं मैदान

---Advertisement---

नंदुरबार : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबार दौरा निश्चित झाला आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ 10 मे रोजी नंदुरबार शहरालगतच्या धुळे रोडवरील मैदानावर पीएम मोदींची भव्य सभा होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रश्खेर बावनकुळे 2 मे रोजी जिल्हयात आले होते. यावेळी लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामकाजी बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी ही माहिती दिली.

बाबा रिसॉर्ट येथे पार पडलेल्या बैठकीला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, खा.डॉ.हिनाताई गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, आ.राजेश पाडवी, आ.काशीराम पावरा, भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार भाऊ रंधे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तालुका अध्यक्ष जे. एन. पाटील यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment