PM Narendra Modi : शिवरायांच्या पुतळाप्रकरणी मागितली जाहीर माफी, म्हणाले, छत्रपती…

PM Narendra Modi : सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाहीये. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीये. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली.

पालघरमध्ये आज शुक्रवार, ३० रोजी सुमारे ७६ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आदी उपस्थित होते.

विरोधकांवर निशाणा
आमचे संस्कार वेगळे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काही लोकांनी भारताचे महान सपुत्र वीर सावरकर यांना शिव्या दिल्यात. जे लोकं वीर सावरकरांना अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहेत, असे म्हणत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही, असे पीएम मोदी म्हणाले.

महाराष्ट्र आणि देशाला होईलफायदा
आज महाराष्ट्र विकासासाठी पूर्णपणे सक्षम आहे आणि संपूर्ण संसाधने आहेत. येथे समुद्र किनारे देखील आहेत. या किनाऱ्यांद्वारे जागतिक व्यापाराचा शतकानुशतके जुना इतिहास आहे. येथे भविष्यासाठीही अपार शक्यता आहेत. या संधींचा पुरेपूर लाभ महाराष्ट्र आणि देशाला मिळेल, असे पीएम मोदी म्हणाले.

पालघरचा वाढवण बंदर प्रकल्प काय आहे ?
वाढवण बंदर प्रकल्प हे पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. त्यामुळे सागरी भागात संपर्क वाढेल. यातून जागतिक व्यापाराला चालना मिळणार आहे. त्याची एकूण किंमत सुमारे 76 हजार कोटी रुपये आहे. या बंदराचा उद्देश आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्ग सुकर करणे हा आहे. ते पूर्ण केल्याने वेळ आणि खर्च वाचेल. परिसराचा विकास होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल.