PM Narendra Modi Ayodhya Visit : अयोध्या रेलवे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन

PM Narendra Modi Ayodhya Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अयोध्या  भव्य राम मंदिर (ram Mandir)  निर्माणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज अयोध्या विमानतळ  आणि अयोध्या रेल्वे स्टेशनचं  उद्घाटन केलं. अयोध्या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल विमानतळाचं असं ठेवण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींचा अयोध्येत भव्य रोड शो
आज पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) आहेत. यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी विविध उपाययोजनांचा शुभारंभ केला, यासोबतच भव्य रोड शोही केला. पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली, यासोबतच प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही करण्यात आला होता.

15000 कोटी रुपयांची भेट
पंतप्रधानांनी येथे अयोध्या पुर्नविकसित रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी नवीन महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल विमानतळाचं उद्घाटन केलं. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येसह उत्तर प्रदेशला 15000 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करत मोठी भेट दिली.

पंतप्रधान मोदी यांचं अयोध्येत स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे गव्हर्नर आनंदीबेन पटेल, यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उप – मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांनी एक तास अयोध्येमध्ये एक भव्य रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांची गर्दी दिसून आली. अयोध्यानगरीत पंतप्रधान मोदींचं ‘जय श्री राम’च्या घोषणा करत स्वागत करण्यात आलं. रोड शोमध्ये पंतप्रधानांवरही पुष्प वृष्टी करण्याच आली.

नवीन रेल्वे गाड्यांनी हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. या सोबतच त्यांनी दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत सहा नव्या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री दिग्गज नेते उपस्थित होते.