10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी ; विरोधकांच्या टोमण्यांवर पीएम मोदींचं जोरदार प्रत्त्युत्तर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टोमण्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिल. आमच्या सरकारला 10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी आहेत. आमच्या सरकारचा एक तृतीयांश (कार्यकाळ) पूर्ण झाला आहे, दोन तृतीयांश बाकी आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

देशाच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला निवडून दिलंय. 60 वर्षांनंतर असं झालयं की एखाद्या पक्षाचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संभ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं.आम्ही केलेल्या सेवेला जनतेनं समर्थन केल देशात सलग तिसऱ्यांदा आमचं सरकार आलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

काही लोक मुद्दाम तोंड फिरवून बसले होते. त्यांना समजलं नाही. ज्यांना समजले, त्यांनी देशातील जनतेच्या तर्कशुद्धतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत गदारोळ माजवला. गेल्या दोन दिवसांपासून मी पाहत आहे की, पराभवही स्वीकारला जात आहे, विजयही स्वीकारला जात आहे. मी काँग्रेसच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो.