---Advertisement---

धुळ्यातील पुनर्निर्मित रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

---Advertisement---

धुळे : केंद्र शासनाच्या ‌‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत येथील रेल्वेस्थानकाचा आता कायापालट झाला असून, गुरुवारी (22 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुनर्निर्मित रेल्वेस्थानकाचे उद्घाटन होणार आहे.

केंद्र शासनाने ऑगस्ट 2023 मध्ये ‌‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत देशातील विविध रेल्वेस्थानकांचे पुनर्निर्मित करण्यासाठी निवड केली होती. यात धुळे रेल्वेस्थानकाचा समावेश नसल्याने तत्कालीन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे रेल्वेस्थानकाला केंद्र शासनाच्या ‌‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करून तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात यश मिळविले होते. या पुनर्निर्मित धुळे रेल्वेस्थानकाचे गुरुवारी (22 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

डॉ. सुभाष भामरे यांनी देशाचे दूरदर्शी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्र्यांकडे सततचा पाठपुरावा करून धुळे रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, एकात्मिक वाहतूक व जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा मिळाव्यात, असा आग्रह केला होता. पंतप्रधान मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी धुळे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. त्यात 9 कोटी 13 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. यात रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी विविध लक्षणीय सुविधा वाढविण्यात आल्या आहेत.

रेल्वेस्थानकात या आहेत सुविधा

फलाटावर नवीन सीओपीचे काम. पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालये. दिव्यांगजन शौचालय. फलाटासह फिरत्या क्षेत्रात नवीन फरशी. नवीन व्हीआयपी कक्ष. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाचे नूतनीकरण. सर्वसाधारण प्रवाशांसाठी प्रतीक्षागृह. कमांडर वेटिंग रूम. प्रवेश आणि बाहेर जाण्याचे आकर्षक प्रवेशद्वार. रेल्वेगाड्यांची घोषणा प्रणाली. साइनेज बोर्ड. कोच इडिकोर. ट्रेन इन्फोर्मेशन सिस्टिम बोर्ड. हेरिटेज नॅरो गेज कोचमध्ये नवीन आरक्षण कक्ष. आजूबाजूच्या क्षेत्राचा विस्तार. कारंजे असलेले नवीन मोठे सुंदर बाग. फिरत्या क्षेत्रात आणि कंपाउंड वॉलमध्ये सुंदर सजावटीची रोषणाई. स्टेशन साइन बोर्ड. नवीन वीज उपकेंद्र व वीज जनित्र.


अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त रेल्वेस्थानक धुळेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री तसेच मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. या पुनर्निर्मित रेल्वेस्थानकाचे गुरुवारी (22 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. जिल्हावासियांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment