विवाहितेने घेतले विषारी औषध; १३ दिवस मृत्यूशी झुंज, तरी…

जळगाव : भडगाव तालुक्यातील गिरड येथे ३० वर्षीय विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. शितल विलास कोळी (३०) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील गिरड गावात शितल कोळी या विवाहिता आपल्या पती विलास कोळी यांच्यासह वास्तव्याला होत्या. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान २० जून रोजी संध्याकाळी शितलने राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान १३ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी ३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून तो शून्य क्रमांकाने भडगाव पोलीस स्टेशनला वर्ग केला. भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. शितल कोळी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.