बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

 

धुळे : शहरातील सहजीवन नगर परिसरातील बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अड्डा उद्धस्त केला. कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रिकाम्या बाटल्या, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स, रसायन, स्पिरीट तसेच इतर साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आगामी सण-उत्सवाचे अनुषंगाने बनावट दारु तयार करणारे अवैध कारखान्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे मंगळवारी ( २६ ऑगस्ट) ही कारवाई केली.

कारवाईअंतर्गत पथकाने सहजीवन नगर येथे वास्तवास असलेला गणेश नारायणराव निकम यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी गणेश निकम (वय ५२, रा. प्लॉट नं. १२, चक्काबर्डी रोड, धुळे) याने त्याचे मयत वडील नारायण बाजीराव निकम यांच्या मालकीचे घरात देशी व विदेशी बनावटीची दारू तयार करून तिची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वीही धुळे शहर पोलीस ठाण्यात दोन तर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची नोंद आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि अमित माळी, पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पोहेकों शिला सूर्यवंशी व हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---