दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड, जळगावातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : घातपाताच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव शहर पोलिसांनी हाणून पाडत, त्यांच्याकडून लोड असलेले दोन गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस जप्त केले होते. ही टोळी शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवित असल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्या टोळीची परिसरातून घींड काढण्यात आली. या कारवाईमुळे भाईगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.


शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हे रात्रीच्या वेळी गस्तीवर होते. त्यांना गेंदालाल मिल परिसरातील माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घराजवळ काही इसम संशयास्पदरित्या फिरतांना दिसले. पोलिसांनी त्यांनी चौकशी केली असता, ते पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला.

त्यामुळे पोलिसांनी त्यांची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. यावेळी टोळीतील एकाच्या कमरेला लोड करुन ठेवलेला गावठी कट्टा मिळून आला. त्याचबरोबतर त्यांच्याजवळ असलेल्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये देखील एक कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आले होते. यावेळी पोलिसांनी टोळीतील चौघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून दोन कट्टे, दहा जीवंत काडतूस आणि कार असा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.


भाईगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


ज्या परिसरात हे सराईत गुन्हेगार दहशत माजवित होते, त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची धींड काढल्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे शहरात भाईगिरी करणाऱ्यांना धडकी भरली असून त्यांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण द्याले आहे.

जेथे होती दहशत तेथेच काढली धींड

घातपाचा डाव उधळून लावणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३, रा. गेंदालाल मिल), सौहील शेख उर्फ दया सीआयडी सद्दाम सलीम पटेल (वय २९, रा. शाहूनगर), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (वय ३१, रा. आझादनगर) व शोएब अब्दुल सईद शेख (वय २९, रा. गेंदालाल मिल) या चौघांना ताब्यात घेतले. ही टोळी गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवित असल्याने शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरातून त्यांची पायी धींड काढण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---