---Advertisement---

स्वारगेट एसटी स्थानकातील अत्याचार प्रकरण; आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी

---Advertisement---

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. दत्तात्रय रामदास गाडे (३७) असे आरोपीचे नाव आहे. गाडेला आज (शुक्रवार) पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

स्वारगेट बस स्थानक हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) चे सर्वात मोठे बस डिपोंपैकी एक आहे. मंगळवारी (२० फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित महिला फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी संवाद साधला आणि “सताऱ्याची बस दुसऱ्या स्टँडवर उभी आहे,” असे सांगून दिशाभूल केली.

यानंतर, आरोपीने पीडितेला स्थानकातील रिकामी उभी असलेल्या शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसच्या आतील दिवे बंद होते, त्यामुळे पीडितेला संशय आला. मात्र, आरोपीने तिला विश्वास दिला की हीच योग्य बस आहे. यानंतर, आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केला.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी १३ विशेष पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला. आरोपीच्या माहितीबद्दल पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अखेर, गुरुवारी रात्री उशिरा तो शिरूर तालुक्यात एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि रात्री दीडच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे हा पूर्वीपासूनच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. त्याच्यावर आधीच चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दाखल आहेत.शिरूर तालुक्यातील शिकरापूर पोलीस ठाण्यात – २ गुन्हे
शिरूर पोलीस ठाण्यात – १ गुन्हा
अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्यात – २ गुन्हे

२०१९ मध्ये तो एका प्रकरणात जामिनावर सुटला होता. त्यानंतर पुणे शहरात पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. काही महिन्यांपूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

पुढील तपास सुरू
सध्या पुणे पोलिसांकडून आरोपीचा अधिक तपास सुरू आहे. त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची सखोल चौकशी केली जात असून, तो इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का, याबाबत देखील तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment