भुसावळातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला प्रोत्साहन देणारा ठेकेदार कोण? पोलिसांसमोर आव्हान

---Advertisement---

 

उत्तम काळे
Love Jihad case in Bhusawal
: भुसावळ येथे गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुलींना फसवून त्यांचे एका विशिष्ट समाजाच्या तरुणांशी विवाह करण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे लव्ह जिहाद रोखण्याचे पोलिसांनाही मोठे आव्हान दिले जात आहे. गेल्या १२ ऑगस्ट रोजी २७ वर्षीय तरुणाने २३ वर्षीय तरुणीची फसवणूक करून तिला पुणे येथे नेत्याचे वृत्त आहे. हिंदू मुलींची फसवणूक करून तिला पुणे, मुंबई येथे नेल्याचे प्रकार सर्रास घडत आहे. त्यामुळे या प्रकरणाला रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासोबतच समाजापुढेही उभे ठाकले आहे.

सेंट अलॉयसेस शाळेतील प्रकाराने अनेक घटना येतील उघडकीस

शहरातील नावलौकिक असलेल्या सेंट अलॉयसियस या इंग्लिश माध्यमाच्या शाळेने शहरात विद्यार्थी व विद्यार्थिनींची सहल काढून मशिदीमध्ये कोणालाही विशेषतः महिला व मुलींना परवानगी नसताना त्या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थिनींना तब्बल तासभर बसवून ठेवले. यासंदर्भात ‘तरुण भारत’ ने आवाज उचलल्यानंतर त्या शाळेची जिल्हा परिषदेने त्रीसदस्य अधिकाऱ्यांकडून चौकशी केली. यात मुख्याध्यापिकेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठ निलंबित करण्याचे आदेश संस्थेला दिले आहे.

हे लव जिहाद प्रकरण चालवण्यात शहरातील एक ठेकेदार आघाडीवर आहे. या ठेकेदाराचा शोध घेऊन या प्रकरणाला आळा घालण्यात यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सेंट अलॉयसियस हायस्कूलमधील प्रकार हाही ‘लव जिहाद’च्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्या आठ शिक्षकांवर केवळ निलंबनाची कारवाई नव्हे तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

फसवणूक झालेल्यानी संपर्क केला तर न्याय मिळवून देणार-दीपक धांडे

भुसावळ येथील शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक दीपक धांडे यांनीही या प्रकरणासंदर्भात आवाज उठवला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या लव जिहादच्या पेंटर ठेकेदाराचे लँड जिहाद करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्या पेंटरने ज्या-ज्या लोकांना फसवले आहे त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

भुसावळचे प्रकरण विधानसभेत गाजणार

दरम्यान, या प्रकरणासंदर्भात जळगाव येथील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असंख्य महिलांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिवेशनात लव जिहादसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात व भुसावळ येथील लहजिहाद प्रकरण संपवणार का? याकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---