---Advertisement---
शेंदुर्णी : गुन्हा घडत असतांना पोलीस तेथे प्रत्यक्षपणे हजर असतीलच ही गोष्ट शक्य नाही. मात्र, गुन्हा घडत असताना त्या परिसरातील नागरिकांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिलेली असली तर अशा नागरिकांनी पुढे येऊन पोलीस तपासात सहकार्य करावे. त्यांनी आरोपीस पकडून देत संबंधितांना न्याय मिळवून देण्यात मदत केल्यास गुन्हेगारीवृत्तीवर अंकुश ठेवता येईल असे शेंदुर्णी दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंमरे यांनी सांगितले.
ते गोंदेगाव येथील युवक सागर पाटील यांनी महत्त्वाच्या गुन्ह्यात तपास कामात गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत केल्याने त्याला बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलत होते.
---Advertisement---
कोणताही गुन्हा घडत असतांना प्रत्यक्षदर्शनी पाहिलेले असते. परंतु, प्रत्यक्षदर्शीं पोलिसांना माहिती देत नसल्याने सत्य माहिती बाहेर येत नाही. परंतु, सागर पाटील सारख्या तरुण गुन्ह्याचा तपासात मदत करतो ही एक कौतुकास्पद बाब आहे. सागर पाटील सारखेच इतर नागरिकांनी पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात सह्कार्यसाठी नेहमी तत्पर राहावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंमरे यांनी केले.
या सत्काराप्रसंगी गोदेगावचे पोलीस पाटील विलास खाकरे, सरपंच देवानंद शिंदे, पो. कॉ. योगेश सुतार, गुलाब पवार व ग्रामस्थ उपस्थित होते .