---Advertisement---

Chalisgaon Crime : पोलिस असल्याची बतावणी; दागिने घेऊन केला पोबारा

---Advertisement---

चाळीसगाव : फिरण्यासाठी आलेल्या महिलेस पोलिस असल्याची बतावणी करून तिघा भामट्यांनी महिलेकडील सुमारे १ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन पोबारा केल्याची घटना २० रोजी पहाटे सव्वा सहा वाजेच्या दरम्यान शहरातील मालेगाव रोडवर रामकृष्णनगर भागात घडली. मात्र, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद पोलिसात नव्हती.

नवलेवाडी, जुने विमानतळ भागातील महिला २० रोजी फिरण्यास बाहेर पडल्या. मालेगावरोडवरील रामकृष्णनगर पाटीजवळ दोन इसम दुचाकीवरून आले व पोलिस असल्याची बतावणी करून तुमचे दागिने काढून द्या, असे सांगत तिसऱ्या व्यक्तीजवळ नेले. महिलेने दागिने काढले. हे दागिने महिलांकडील गाठोड्यात बांधून त्यांनी ते महिलांकडे दिले व ते भामटे पसार झाले. महिलेने गाठोडे उघडून पाहिले असता, त्यात दगडाचे लहान खडे निघाले.

मोबाईल चोरणाऱ्या एकाला पकडले

पारोळा : घरातून मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अंगझडतीत त्याच्याकडून ८७ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिस ठाण्यात आणले असता, त्या ठिकाणी गणेश शिंपी यांनीही घरातून चोरीस गेल्याची घटना कथन केली. चोरटा आनंदा राजेंद्र सरोदे (धुळे) याच्याकडे पाच मोबाईल सापडले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---