यावल : कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भलेही होत असलातरी अलीकडेच भुसावळात दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर यावलच्या निरीक्षकांसह त्यांच्या सौभाग्यवतींनाही कोरोनाचे लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघांची प्रकृती स्थित असलीतरी जिल्ह्यात कोरोना अद्याप तळ ठोकून असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरीकांनी सतर्कता बाळगून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
निरीक्षकांसह पत्नीलाही कोरोना
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सपत्नीक कोरोना लागण झाली असून पहिल्या टप्प्यातील लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी करून घेतल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पत्नी वर्षा मानगावकर यांना गेल्या चार दिवसांपासून ताप आल्याने स्वतःहून या दाम्पत्याने आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यात त्यांचा आरटीपीसीआर अहवाल हा कोरोनाबाधीत आल्याने दोघांवर घरीच उपचार सुरू करण्यात आले. आपल्या निवासस्थानी हे दाम्पत्य कॉरंटाईन असून प्रथम टप्प्यातील लक्षणे असल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार झाले असून दोघांची प्रकृती मात्र आता ठणठणीत आहे. कोरोना संदर्भातील लक्षणे जाणवल्यास आपण स्वतःहून तपासणी करून घ्यायला हवी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच तपासणी करीत प्रथम उपचारात आपण बरे होऊ शकतो, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.