---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथून चोरीला गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा छडा लावत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२४ जुलै २०२५ रोजी रमेश उखा राठोड (४०, शेवरी) यांनी याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांच्या घरासमोरून २३ जुलै रोजी रात्री ८ ते २४ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच.१९/सीबी. ५५०२) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेवरी गावातील पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बाळू मेटकर (२३) व पुष्पक अशोक भालेराव (२३, दोघेही तळेगाव, ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी करजगाव येथून दुचाकी आणि मोबाइल तसेच शेवरी येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.