मुंबई : राज्यात लवकरच १७ हजार ४७१ जागांवर पोलीस भरती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली आहे. राज्यात २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याचेही ना.फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन वर्षांतील तुलना केली तर २०२३ मध्ये ७७ गुन्हे कमी आहेत. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणी आणि ५१ सायबर प्रयोगशाळा सुरू आहेत. नवीन राज्यस्तरीय सायबर केंद्र लवकरच सुरू केले जाईल. यासाठी ८०० कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याशिवाय २० गस्ती नौका खरेदी करण्यासाठी ११७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पोलिसांना समुद्रात पोहण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.