---Advertisement---

लाल मिरची पावडर अन् पिवळ्या पट्ट्या घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

---Advertisement---

जळगाव : पोलिसांनी पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने बुधवारी (२८ मे) रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेले संशयित आरोपी सोनू चक्कर चव्हाण (२५), यशवंत निराधार पवार (४२), धर्मा चिमण भोसले (४०) आणि भरत निराधार पवार (३८ सर्व रा.जामदे ता. साक्री जि.धुळे) यांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, दोन दुचाकी तसेच लाल मिरचीची पावडर आणि पिवळ्या पट्ट्या असा एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, त्यांच्याकडून अजून काही इतर चोरीचे किंवा दरोड्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment