---Advertisement---
जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०) यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे केवळ बिअर न दिल्याचे कारण नसून, हा एक पूर्वनियोजित हल्ला असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अनेक व्यक्तींची चौकशी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
पुनगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी असलेले आणि सध्या जळगाव येथील चंदू अण्णा नगर येथे वास्तव्यास असलेले प्रमोद बाविस्कर त्यांच्या हॉटेलसमोर कारमध्ये बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. यात गंभीर जखमी झालेल्या बाविस्कर यांच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ट्रकला धडक देत चालकाला चिरडले
नंदुरबार : लघुशंकेसाठी चालकाने थांबवलेल्या मालट्रकला समोरून आलेल्या दुसऱ्या ट्रेलरने जबर धडक दिली. ही बाब लघुशंकेसाठी गेलेल्या चालकाला दिसताच तो रस्त्यावर येताच त्यालाही ट्रेलरने धडक देऊन ठार केल्याची घटना बुधवारी रात्री तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील मेंढवळ गावाजवळ घडली. अनिलकुमार राजकुमार बसरमल (२९) असे मयत चालकाचे नाव आहे.