पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षक थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून त्यांना कळवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना आता मसूरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूवातीला ३ जून २०२४ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. मात्र एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. वाशिममध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं. तिथे पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून २५ पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवांना पाठवण्यात आला होता त्यानंतर त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती. वाशिममधील दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली आहे.
लाला बहादूर शास्त्री मसूरीमधील या अकॅडमीने हा निर्णय घेतला आहे. या अकॅडमीकडून राज्य सरकारला अहवाल देण्यासंदर्भात आदेश देण्यात आला होता. राज्य सरकारने हा अहवाल पाठवला असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांना २३ तारखेपर्यंत मसुरी येथील अकॅडमीमध्ये हजर रहावं लागणार आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांचे आई-वडील दोघेही आता फरार आहेत. पूजा यांची आईच्या एका शेतकऱ्यावर बंदूक ताणल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता हे प्रकरण वाढत चाललं असून खेडकर यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.