तरुण भारत लाईव्ह । ८ सप्टेंबर २०२३। सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेते- दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सूत्रानुसार, आज सकाळी एका टीव्ही शो साठी ते स्टुडिओ मध्ये डबिंग करत असताना ते कोसळले त्यांना वडपलानी येथे एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी बैकियालक्ष्मी आणि दोन मुले- अकिलन आणि ईश्वर्या असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चेन्नई याठिकाणी असणाऱ्या घरी विरुगंबक्कममध्ये येथे नेण्यात येणार आहे, तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. ‘वली’, ‘जीवा’, ‘पेरियारम पेरुमल’ आणि ‘जेलर’ या प्रोजेक्टमध्ये त्यांनी संस्मरणीय कामं केली आहेत. २०२२ पासून, ते तामिळ टीव्ही मालिका ‘इथिर नीचल’चा एक भाग होते. शिवाय ते युट्यूबवरही प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.