पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत मोठी अपडेट; वाचा काय म्हणतोय सर्व्हे

नवी दिल्ली : वर्ल्ड लिडर म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतात कशी आहे ? यावर नेहमीच चर्चा होत असते. आता लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक याबाबत परस्पर विरोधी दावे करतांना दिसत आहेत. याबाबत अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या इप्सोस इंडियाबस या संस्थेने एक अहवाल प्रसिध्द केला आहे.

समोर आलेल्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रूवल रेटिंमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. त्यात आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना दिवसेंदिवस मान्यता वाढत असल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक महत्त्वाच्या घटना देशात घडल्या आहेत. कोरोना काळात व त्यानंतर भारताचा जागतिक पातळीवर दबदबा वाढला आहे. कश्मीर मधून कलम ३७० हटविणे, अयोध्येत राममंदीराचे निर्माण, मेक इन इंडियाचा वाजणारा डंका, जी २० परिषदेचे यश अशा काही गोष्टी मोदींच्या पथ्यावर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांची अप्रूवल रेटिंग वाढली आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आहे.

कोणत्या वर्गाने मोदींना किती रेटिंग दिलीय

४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती- ७९ टक्के

१८ ते ३० वयोगटातील व्यक्ती -७५ टक्के

३१ ते ४५ वयोगटातील व्यक्ती -७१ टक्के

कोणत्या क्षेत्रात किती रेटिंग

प्रदूषण आणि पर्यावरण – ५६ टक्के

गरीबी निर्मूलन- ४५ टक्के

चलनवाढ रोखणे- ४४ टक्के

बेरोजदारी दूर करणे- ४३ टक्के

भ्रष्टाचार संपवणे- ४२ टक्के