प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा

नवी दिल्ली : श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केला आहे. लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

श्रीलंकन लष्कराने तमिळ बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी जाफना आणि उत्तर श्रीलंकेत केलेल्या लढाईत लिट्टे सह त्याचा प्रमुख व्ही प्रभाकरन ही मारला गेल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या कुटुंबासह राहत आहे, असा दावा आता माजी काँग्रेस नेते पळा नेदुमारन यांनी केला आहे. नेदुमारन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे.