भारत, २०२४- एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनीची नेमणूक महाराष्ट्र सरकारकडून प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) ची अंमलबजावणी करण्यासाठी एजन्सी म्हणून केली असूनही अंमलबजावणी कर्जदार आणि कर्ज न घेतलेल्या उस्मानाबाद, धुळे, पुणे, हिंगोली आणि अकोला जिल्ह्यातील २०२४साठी ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पीएमएफबी वाय योजनेअंतर्गत शेतकर्यांना विविध प्रकारच्या बाह्यधोक्यांपासून शेतकर्यांना विमा संरक्षण दिले जाते, यामध्ये दुष्काळ, पूर, पावसाने ओढ घेणे, दरडकोसळणे, चक्रीवादळ, वादळे, धुळीचीवादळे, पूरपरिस्थिती, कीडीचा प्रादुर्भाव होणे, आजार आणि अन्यगोष्टींचा समावेश आहे.
पिकाचे नुकसान समजून घेण्यासाठी राज्यसरकारकडून या योजनेअंतर्गत समावेश असलेल्या पिकांचे क्रॉपकटिंगएक्सपिरिमेंट्स (सीसीईज) चेनियोजन आणि आयोजन करण्यात येते. जरसीसीईजचे आयोजन केल्यानंतर उत्पादनाची आकडेवारी कमी आढळल्यास शेतकर्यांना उत्पादनातील फरक दिला जातो. या विमा योजनेमध्ये पिकांच्या लागवडीसह अनेक टप्प्यांमध्ये काम केले जाते जसे पेरणीपूर्वी, पेरणी आणि कापणीनंतरच्या धोक्यांचा अभ्यास केला जातो. पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत असेलल्या उत्पादनांना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे. उस्मानाबाद, धुळे, पुणे, हिंगोली आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी हेत्यांच्या बँकेशी किंवा त्यांच्या जिल्ह्यातील कॉमनसर्व्हिस सेंटर्स (सीएससीज) किंवा एचडीएफसी अर्गोच्या एजंटशीसंपर्कसाधून वरील पिएकांसाठीपीएमएफबीवाय योजनेचा लाभ घेऊ शकतील. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी शेतकरी कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकतील. आता शेतकरी फार्मर्स ॲपवर किंवा https://pmfby.gov.in/farmerLogin या वेबसाईटला भेट देऊन या योजनेत स्वत: नावनोंदणी करु शकतील.