Pradhan Mantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं की ”आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार १ कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.”
घरांच्या छतावर सौर पॅनल बसवुन सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने विजनिर्मीती केली जाते. ज्यामुळे विजबील कमी होण्यास मदत होईल आणि उर्जेच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यातही मदत होणार आहे.
अनेक अशी घरे जी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती करतात त्यांच्याकडुन सरकार ती वीज विकतही घेते. त्यामुळे या पद्धतीनेही त्या घरांना फायदा होणार आहे.