‘या’ ५ मंत्रांनी करा श्रीगणेशाची स्तुती; मिळेल प्रत्येक कामात यश

तरुण भारत लाईव्ह । १३ मार्च २०२३ । हिंदू धर्मात कोणत्याही कामाआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे. असे म्हणतात की, श्रीगणेशाची पूजा केल्याने प्रत्येक शुभ कामात यश मिळते. श्रीगणेशाची पूजा करताना या ५ मंत्रांचा जप केल्यावर श्रीगणेशाची कृपा आपल्यालावर राहील. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे ५ मंत्र.

 १) वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।
     निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा॥

अर्थ –  या मंत्राचा अर्थ असा की, ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे, ज्याचे तेज करोडो सूर्यासारखे आहे, अशा देवता माझी सर्व कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ द्या.

२) एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं।
    विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥

अर्थ – तुषारांनी शोभलेल्या, विशाल शरीर असलेला आणि जो विघ्नांचा नाश करणारा आहे अशा दिव्य भगवान हेरंबांना मी प्रणाम करतो.

३) विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
   नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

अर्थ– या मंत्रात नमूद केलं आहे की, ज्याला एक दात (एकदंताय) आहे, सुंदर चेहरा आहे, जो त्याचा आश्रय घेणाऱ्या भक्तांचे रक्षण करतो, जो सर्व प्राणिमात्रांचे दुःख हरण करतो, त्याला आम्ही नमन करतो.

 ४) ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये।
    वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।
अर्थ
– या मंत्राचा अर्थ आहे हे श्री गणेशा तुमच्या मुळे हा जन्म मिळाला आहे. अशीच तुमची कृपा माझ्यावरती कायम असुदेत.

५) ॐ गं गणपतये नमः।।
अर्थ
– हा सर्वात प्रभावी मंत्र म्हटला जातो, हा मंत्र आपण कुठेही म्हटला तरी चालतो, या मंत्राचा नियमित जप फार प्रभावी असतो.