मुक्ताईनगर : प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी करकी ता. मुक्ताईनगर येथे प्रादेशिक परिवहण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी उपोषणास बसले आहेत. शासन स्तरावरून उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे उपोषणस्थळी संविधानिक पद्धतीने पाडवा साजरा करण्यात आला.
दरम्यान, या वेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधीकार्यांना पत्र देऊन मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु लोकप्रतनिधी तसेच अधिकारी उपोषणस्थळी आले नाहीत. शेवटी उपोषण कर्त्यांनीच उपोषणस्थळी संविधानिक पद्धतीने पाडवा साजरा केला व प्रशासनाच्या भोगळ कारभाराचा निषेध नोंदवला.
या वेळी प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे, राज्य अध्यक्ष पंकज सपकाळे, राज्य सचिव सतीश मोरे, जळगाव जिल्हा संघटक अमित तडवी, युवा जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे उपस्थित होते. सरकार ने लवकरात लवकर भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी देखील अशोराज तायडे यांनी केली.