---Advertisement---
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला. आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य सभा झाली. या सभेत इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. सभेपूर्वी राहूल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. शरद पवार, मेहबुबा मुफ्ती, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडक या सभेत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची ही पहिलीच सभा आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केले. आपल्या सर्वांना लढावं लागेल. एकत्र लढू किंवा वेगळं लढू, पण आपल्यालाल लढावं लागणार आहे, असे प्रकश आंबेडकर म्हणाले.