Prakash Ambedkar : आंबेडकरांचं एकनाथ खडसेंविषयी मोठं विधान, म्हणाले…

रावेर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज रावेरमध्ये आहेत. यावेळी प्रचार रॅलीला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते.

शरद पवारांना आवाहन
शरद पवार यांना माझं आवाहन आहे. तुमच्याकडे एखादी मशीन आहे का ? मशीनमध्ये टाकल्यावर नेते साफ होतील अशी, अशी उपरोधिक टिप्पणी करतानाच एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवार यांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.