---Advertisement---

Pranjal Khewalkar Arrested : एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला

---Advertisement---

---Advertisement---

Pranjal Khewalkar Arrested : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत एक मित्र आणि तीन महिलांसह रेव्ह पार्टीत करताना खेवलकर यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, या पार्टीत हुक्का, दारूसह अंमली पदार्थ देखील सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार पक्ष) महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती प्रांजल खेवलकर यांना एक मित्र आणि तीन महिलांसह पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर खेवलकर यांच्यासह इतरांना वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयात नेण्यात आले असून, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पार्टीत करतानाच पोलिसांनी मारला छापा

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे एक मित्र आणि तीन महिलांसह रेव्ह पार्टीत करतानाच पोलिसांनी छापा मारला. त्यानंतर खेवलकर यांच्यासह इतरांना वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयात नेले. दरम्यान, या पार्टीत हुक्का, दारूसह अंमली पदार्थ देखील सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय म्हणाले खडसे ?


या कारवाई संदर्भात मला अद्यापही पूर्ण माहिती मिळालेली नाही. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलेल, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर केला आहे. तसेच खडसे यांनी जो दोषी असेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment