तरुणांना वाचविण्यासाठी आली अन् उलटली ‘एसडीआरएफ’ची बोट; तिघांचा मृत्यू

अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली असून, या अपघातात ‘एसडीआरएफ’ पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरफ पथकाची बोट आली असताना ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत ५ जण बुडाले असून, तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळची ही घटना आहे.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले असून इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी ही माहिती दिली.