– रवींद्र दाणी
2022 च्या फेब्रुवारीत सुुरू झालेल्या युक्रेन युद्धाने 2023 च्या फेब्रुवारीत पर्दापण केले असून, हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
आणि आता, 2025 मध्ये चीन-अमेरिका war preparations युद्ध सुरू होण्याचा इशारा अमेरिकेच्या एका सेनापतीने दिला आहे. त्याचप्रमाणे भारत-चीन सीमेवरील स्थितीवर अमेरिकेचे लक्ष असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पूर्व लडाख भागातील काही टेहळणी चौक्यांवर आता भारताचे नियंत्रण राहिलेले नाही असा एक अहवाल लेहच्या पोलिस अधीक्षकाने दिल्यानंतर अमेरिकेची ही प्रतिक्रिया आली आहे.
65 टेहळणी चौक्या
war preparations : पूर्व लडाख भागात भारत-चीन सीमेवर एकूण 65 टेहळणी चौक्या आहेत. त्यातील 26 चौक्यांवर 2020च्या भारत- चीन चकमकीनंतर भारताचे नियंत्रण राहिलेले नाही असे या अहवालात म्हटले आहे. या 26 चौक्यांवर भारताचे नियंत्रण राहिलेले नाही याचा नेमका अर्थ काय? भारताचा किती भाग चीनच्या ताब्यात गेला आहे यावर अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. या संदर्भात भारतीय लष्कर व भारत सरकार यांच्या विधानांवर विश्वास ठेवण्यात आला पाहिजे. मात्र चीनच्या कारवाया भारताच्या विरोधात राहणार आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या सार्याचा अंदाज भारत सरकार व अमेरिकन प्रशासन यांना आला आहे. बहुधा यातूनच बायडन प्रशासनाने- भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांंपूर्वी पाकिस्तानच्या एका दहशतवाद्यास सूचीबद्ध करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने घेतला. त्यातही अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावीत भारताला पाठिंबा दिला होता. चीन हा भारत व अमेरिका या दोघांचाही समान शत्रू असल्याने अमेरिका या विषयात भारताच्या बाजूने उभी ठाकेल असे समजण्यास हरकत नाही.
समस्या रशियाची
आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झपाट्याने बदलत असलेल्या स्थितीत भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे चीन- रशिया यांची वाढती मैत्री! हे दोन्ही देश आपल्या मैत्रीच्या पुन्हा पुन्हा आणाभाका घेत आहेत. war preparations एकीकडे अमेरिकेचे रशियाशी वाकडे आहे आणि भारत हा रशियाचा एक जवळचा मित्र राहिला आहे. सोवियत युनियन- रशियाने कधीही भारताला दगा दिलेला नाही. पण, पूर्वीचा सोवियत युनियन आणि आता रशिया यात फरक आहे. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सोवियत युनियन व चीन यांच्यात फारसे सख्य नव्हते. त्यामुळे भारताला चिंता वाटावी असे काही नव्हते. आता स्थिती बदलली आहे. सोवियत युनियन राहिलेले नाही. रशिया पूर्ण बदलला आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने चीनशी संधान साधले आहे. आणि हीच बाब भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. उद्या भारत-चीन संघर्ष उद्भवल्यास रशिया कुणाच्या बाजूने जाईल की तटस्थ राहील असा प्रश्न आताच उपस्थित होत आहे.
नवा भडका
युक्रेन war preparations युद्ध दुसर्या वर्षात जात असताना, अमेरिका व जर्मनी यांनी आपले अद्ययावत रणगाडे युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर हे युद्ध अधिक भयावह व व्यापक होण्याची स्थिती तयार झाली आहे. युक्रेन मागील काही महिन्यांपासून या रणगाड्यांची मागणी करीत होता. युरोपमध्ये रणगाडे तयार करणारा एक प्रमुख देश म्हणजे जर्मनी! जर्मनीने काही कारणास्तव युक्रेनला रणगाडे देण्यास नकार दिला होता. यातील एक कारण म्हणजे पूर्वीच्या पूर्व जर्मनीत रशियाबाबत असलेली भावनिक जवळीक. 1989 मध्ये बर्लिनची भिंत कोसळून जर्मनीचे एकीकरण होईपर्यंत पूर्व जर्मनी सोवियत युनियनच्या गटात होती. अशा या रशियाविरुद्ध आपले रणगाडे वापरल्यास याची पूर्व जर्मनीत कोणती प्रतिक्रिया उमटेल याबाबत जर्मन चान्सलर ओलाफ शुज यांना धाकधूक वाटत होती. या कारणाने ते आपले रणगाडे युक्रेनला देण्यास विरोध करीत होते असे मानले जाते. जर्मन बनावटीचा लेपर्ड- 2 हा रणगाडा जगातील एक उत्तम रणगाडा मानला जातो. जर्मनीत तयार झालेले जवळपास 2000 रणगाडे युरोपातील देश वापरीत आहेत. मात्र, या देशांना हे रणगाडे परस्पर युक्रेनला देण्याचा अधिकार नाही. युक्रेनचा शेजारी असलेला पोलंड आपल्याजवळ असणारे लेपर्ड रणगाडे युक्रेनला देण्यास तयार होता. पण, जर्मनी त्यास तयार नसल्याने पोलंडला हे करता आले नाही.
जनमताचा रेटा
जनमताचा रेटा अशी एक बाब असते की, ती सरकारांना आपली भूमिका बदलविण्यास भाग पाडते. जर्मनीत तेच घडले. जर्मन सरकारमधील घटक पक्षांनी जर्मन चान्सलर शुज यांच्यावर युक्रेनला लेपर्ड रणगाडे देण्याबाबत दबाव आणला. जर्मनीत यासाठी अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली. जर्मन संसदेत यावर चर्चा सुरू असताना, ‘चित्त्याला मोकळे करा’ असे फलक घेऊन बाहेर निदर्शने केली जात होती. अशा या जनमताच्या रेट्यासमोर चान्सलर शुज यांना नमते घ्यावे लागले आणि युक्रेनला हे रणगाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. जर्मनीच्या या निर्णयानंतर युरोपातील देशांनी आपापल्या लष्करातील काही रणगाडे युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचा ‘अब्राहम’!
जर्मनीने लेपर्ड देण्याचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी आपल्या लष्करातील ‘अब्राहम’ हा रणगाडा युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. अब्राहम लिंकन यांच्या नावाने नामकरण झालेला हा रणगाडा जगातील सर्वोत्तम रणगाडा मानला जातो. येत्या दोन महिन्यांत रणगाड्यांची ही नवी खेप युक्रेनला मिळेल. तोपर्यंत युक्रेनचे सैनिक हा रणगाडा हाताळण्यासाठी प्रशिक्षित झालेले असतील. अब्राहम आणि लेपर्ड रणांगणात आल्यावर रशियाचा ‘आर्माटा’ या रणगाड्याशी होणारा मुकाबला चित्तथरारक आणि विध्वंसकही राहणार आहे. त्यानंतर या war preparations युद्धाचा पुढील भाग सुरू होईल.
दोन वर्षांत मोठे युद्ध
रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट दृष्टिपथात दिसत नसताना, आगामी दोन वर्षांत अमेरिका व चीन यांच्यात war preparations युद्ध सुरू होईल असा अंदाज अमेरिकेचे एक सेनापती जनरल माईक मिनिहान यांनी वर्तविला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन करताना पुढे म्हटले आहे, चीनचे राष्ट्रपती जिन शी पिंग यांना 2022 मध्ये तिसरी टर्म मिळाली आहे. त्यांनी आपली युद्ध परिषद गठित केली आहे. अमेरिकेत 2024 मध्ये राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे तैवानमध्येही 2024 मध्ये निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणुका आटोपल्यावर म्हणजे 2025 मध्ये चीन-अमेरिका यांच्यात संघर्ष उद्भवू शकतो.
तयारीचा आदेश
जनरल मिनिहान यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कमांडकडे सैन्य- व सैन्य सामुग्रीची जमवाजमव करण्याचे काम आहे. त्यांनी आपल्या कमांडला 2025 डोळ्यासमोर ठेवून तयारी करण्याचा आदेश जारी केला आहे. चीनचा डोळा तैवानवर आहे. चीन फक्त योग्य संधी व वेळापत्रक याचीच वाट पाहत आहे, असेही जनरल मिनिहान यांनी म्हटले आहे. माझा अंदाज चुकीचा ठरावा अशी माजी इच्छा आहे. मात्र, तोपर्यंत आम्हाला 2025 च्या war preparations युद्धाची तयारी आतापासून सुरू करण्याशिवाय पर्याय नाही असा आदेश जारी करीत त्यांनी आपल्या कमांडला सज्ज होण्यास सांगितले आहे.
जगावर मंदीचे सावट येत असताना, या युद्धवार्ता अशुभ संकेत देणार्या ठरत आहेत.