जळगाव । सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. कधी कडक ऊन, तर कधी वादळीसह पाऊस. जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वादळामुळे सर्वत्र धुळ पसरलेली होती. त्यांनतर ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या सरी कोसळत आहे. मात्र यामुळे काहीसा गारवा निर्माण झाल्याने जळगावरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
जळगाव जिल्ह्याला आज रविवार पासून पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
अशातच आज दुपारी अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जळगाव शहर आणि परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती. जोरदार वाऱ्यांमुळे जळगाव शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्य मानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते.
दरम्यान, या अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेकांना फटका बसल्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे.