तळोदा : आदिवासींच्या अस्तित्वासाठी आदिवासी रूढी-परंपरांचे जतन अत्यावश्यक असून त्यांच्या संवर्धनासाठी नव्या पिढीला त्यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्य आयोजक नागेश पाडवी यांनी केले. या विशेष मार्गदर्शन शिबिरात आदिवासी रूढी परंपरांचे जाणकार खोपी गुजरात येथील सखाराम बाबा यांनी रुढीपरंपरांबाबत सखोल मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप वसावे, किरसिंग वसावे, जयमलसिंग पाडवी, माजी आमदार सुभाष वसावा, महाराज नितीन पाडवी, धर्म जागरण जिल्हाप्रमुख महाराज हंसराज, चंदू गावित, रूढी परंपरा जतन जिल्हाप्रमुख ईश्वर गावित, नरसी बापू पंचायत समिती माजी सदस्य अशोक राऊत ,धनसिंग वसावे, सुधीर पाडवी, रणजीतसिंग पाडवी, प्रा. भीमसिंग वळवी ,जगदीश वसावे रामसिंग वळवी, कालूसिंग पाडवी, कांतीलाल पाडवी उपस्थितीत होते.
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कै. दिलवरसिंगदादा पाडवी नगरात आज दि. २३ मार्च रोजी आदिवासी रूढी परंपरा जतन समितीतर्फे आदिवासी रूढी परंपरा जतन व संवर्धनासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या प्रास्ताविकात पुढे बोलताना नागेश पाडवी यांनी सांगितले की, आदिवासी समाज निसर्ग पूजक समाज असून सृष्टीचे रक्षण करणारा आहे. आपले रूढी परंपरा या नैसर्गिक ऋतुमानानुसार पारंपारिक पद्धतीने साजरा केल्या जात असून आधुनिक काळात अस्तित्वासाठी त्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे झाले आहे. नव्या पिढीला त्याचे ज्ञान करून देणे आपले कर्तव्य असल्याने अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्या रूढीत परंपरा आजही अनोख्या व आश्चर्यकारक असल्याने त्यांचे जतन व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे . या विशेष मार्गदर्शन शिबिराची सुरुवात गुजरात राज्यातील खोपी येथील आदिवासी रूढी परंपरांचे जाणकार सखाराम बाबा यांनी आदिवासींचे कुलदैवत यहा मोगी मातेच्या मूर्तीची पारंपारिक विधीवत पूजनाने करून आदिवासी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक सखाराम बाबा यांनी आदिवासी समाजातील विविध रूढी परंपरांचे सखोल पणे मार्गदर्शन केले. या शिबिरास नितीन महाराज, सरपंच भूपेंद्र पाडवी, नरेश पाडवी, किसन नाईक, आकाश वसावे, रोशन पाडवी, पंचायत समिती माजी सदस्य सांगल्या वसावे, काथा वसावे, एड. रूपसिंग वसावे, अनिल पाडवी , हरिदास गोसावी, बाबूलाल बुवा, रूपसिंग पाडवी, भूषण पाडवी, पंचायत समिती माजी सभापती रुषाबाई वळवी, जिल्हा परिषद माजी सदस्या वत्सलाबाई पाडवी , जमुनाबाई वसावे, सरपंच चंपाबाई पाडवी, यमुनाबाई पाडवी ,रंजनाबाई राऊत, जमनाबाई वसावे, प्राचार्य हंसाबेन पाडवी आदिंसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी बांधवांचे कुलदैवत याहा मोगी मातेची आरती करून करण्यात आली यावेळी मातेच्या साक्षात झुल्यावर झुलतानाचा देखावा सादर करण्यात आला या आरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून भावनिक वातावरण निर्माण केले.
प्रमुख मार्गदर्शक सखाराम बाबा यांनी पेचराविधी, लग्नविधी, निलीचारी पूजन, आडवा लाकूड पूजन, माटल्यादेव पूजन ,गोवाल पूजन, वाघदेव पूजन, दिवसा पूजन, बैलपोळा पूजन, गाव दिवाळी पूजन ,खळे पूजन, गव्हाण पूजन, गीमदेव/ गावदेवती, होळी माता पूजन आदीं विधी बाबत मार्गदर्शन केले.