धक्कादायक! वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा

धुळे : धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात आज समोर आला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाचे फोटो काढून नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअपद्वारे पाठवून वकिलाने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलती बंद व्हावी, यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धुळे येथील दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये चालू असलेल्या सदर दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये पंढरीनाथ भीला पाटील यांचे वकील अ‍ॅड. शामकांत पाटील यांनी जास्त बोलू नये किंवा त्यांची बोलती बंद करण्यासाठी न्यायालयाची इमारत व आवारामध्ये विना परवानगी पक्षकार पंढरीनाथ भिला पाटील आणि त्यांचे वकील शामकांत पाटील यांचे फोटो जादुटोणा करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एका मौलानाच्या मोबाईल व्हॉट्सअपवर पाठविले.

ही बाब अ‍ॅड. शामकांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित संशयित आरोपी निसार शेख आमिर खाटीक याची चौकशी करून मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने ही बाब उघडकीस आली. अ‍ॅड. शामकांत रावजी पाटील यांच्या फिर्यादीवरून निसार शेख अमीर खाटीक याच्या विरोधात नरबळी आणि इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदानुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार शेख अमिर खाटीक विरुद्ध पंढरीनाथ भिला पाटील यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र २१९/ २९१६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.