---Advertisement---

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींचे नाशिकमध्ये आगमन, काळाराम मंदिरात दर्शन

---Advertisement---

Prime Minister Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहेत. नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी नव्या अधिकाऱ्यांची फौज स्वागताला पाहायला मिळाली. प्रधान सचिवपदाची सूत्रं नुकतंच स्वीकारलेले नितीन करीर, नवनिर्वाचित पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला
नरेंद्र मोदींच्या स्वागताला होत्या.

राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदी हे रोड शो आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment