नरेंद्र मोदी यूट्यूब चॅनलने व्ह्यूज आणि सब्सक्राइबरच्या बाबतीत भारत आणि जगातील इतर नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मागे टाकले आहे. पीएम मोदी नेहमीच डिजिटलच्या बाजूने राहिले आहेत.
त्यांची गणना भारतातील अशा नेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी डिजिटल लेन्सद्वारे राजकारणाचे जग पहिले होते. आज त्यांचे यूट्यूब चॅनल जगातील इतर कोणत्याही नेत्याच्या यूट्यूब चॅनेलपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स असलेले चॅनल बनले आहे.
पीएम मोदींच्या नरेंद्र मोदी चॅनलचे २ कोटींहून अधिक सदस्य आहेत. पीएम चॅनलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर अपलोड केलेले व्हिडिओ लोकांना आवडतात. अनेकदा एखाद्या व्हिडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळतात.