---Advertisement---

पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा : शेतकऱ्यांना 6000 नाही तर 12 हजार मिळणार

---Advertisement---

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. दरम्यान, राजस्थानमध्ये याच दरम्यान, एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये दिले जातील. याशिवाय एमपीसीवर शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करून बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मध्य प्रदेशातही भाजपाने आश्वासन दिलं आहे की, जर मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन झाले तर पीएम किसान अंतर्गत 12,000 रुपये दिले जातील. यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा 15 वा हप्ता जारी केला होता. याआधी, सरकारने 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पाठवली होती.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment