नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. निधनाची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला रवाना झाले. आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला या दु:खातून स्वत:ला सावरत तासाभरातच पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी बंगालमधील हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणार्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. आईच्या निधनामुळे मोदींनी पश्चिम बंगालचा दौरा पुढे ढकलला, मात्र त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकातामधील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ती देशाला समर्पित केली. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडा दाखवत असताना आणि हावडा स्टेशनवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते.७८,०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. २,५५० कोटींहून अधिक किमतीच्या अनेक सीवर पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. कोलकाता मेट्रोच्या जोका-तरातला पर्पल लाईनचे उद्घाटनही करण्यात आले.
या कार्यक्रमा दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. आदरणीय पंतप्रधान, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा आणि खूप मोठे नुकसान आहे. मी देवाला प्रार्थना करतो, देव तुम्हाला शक्ती देवो. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही पश्चिम बंगालला येणार होता, पण तुमच्या आईच्या निधनामुळे तुम्ही येऊ शकला नाही, पण तरीही सामील झालात. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. आज मला माझ्या आईची आठवण येत आहे. कोणत्या शब्दात व्यक्त करावं तेच कळत नाही. तुमच्या आईच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे, असं ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना म्हणाल्या.
PM Modi flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri, in West Bengal, via video conferencing. West Bengal CM Mamata Banerjee, Union railway minister Ashwini Vaishnaw & other leaders present at the event in Howrah. pic.twitter.com/YFuoltdslX
— ANI (@ANI) December 30, 2022