---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, २०१४ नंतर प्रथमच स्मृती मंदिराला देणार भेट

---Advertisement---

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे येत आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते पहिल्यांदाच रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. याशिवाय शहरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाचा शिलान्यास पंतप्रधानांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटनही होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. २०१७ साली पंतप्रधान दीक्षाभूमीत आले होते. त्यानंतर त्यांची आता दीक्षाभूमीस ही दुसरी भेट आहे.

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी दोनदा दीक्षाभूमीला भेट दिली नाही. नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, जे पंतप्रधानपदी विराजमान असताना दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला भेट देत आहेत. पाच तासांचा नागपूर दौरा रविवारी सकाळी ९ च्या सुमारास पंतप्रधानांचा नागपूर दौरा सुरू होणार आहे. सर्वांत आधी ते रेशीमबागच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होतील. तेथून पंतप्रधान माधव नेत्रालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते संरक्षण क्षेत्रातील अग्रेसर कंपनी सोलार इंडस्ट्रिज येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांचा हा पाच तासांचा नागपूर दौरा असणार आहे.

२०१४ नंतर प्रथमच स्मृती मंदिराला भेट देणार

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार असून ते पहिल्यांदा स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. या वेळी ते शक्तिस्थळी पुष्प अर्पण केल्यानंतर काही वेळ त्या ठिकणी घालवणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment