पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज रविवारी सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. तब्बल ३४०० कोटी रुपये गुंतवून ३५.५४ एकर जमिनीवर उभारलेले सूरत डायमंड बाजार खडबडीत आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे.
आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक ‘कस्टम क्लिअरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा यांचा यामध्ये समावेश असणार आहे.