Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आज प्रभू श्री राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील….

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्यानंतर उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी मोदी काहीक्षण भावूक झाले आज मी प्रभू श्री रामाचीही माफी मागतो. आपल्या प्रयत्नात, त्यागात आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी उणीव असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज हे काम पूर्ण झाले आहे. माझा विश्वास आहे की आज प्रभू श्री राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज आपले प्रभू राम आले म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
आज आपले राम आले आहेत.

२२ जानेवारी हा दिवस वर्षानुवर्ष लक्षात राहिलं. आपले राम आता झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन आहे,” असे म्हणत पंतप्रधान काही क्षण भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.

आज हमारे राम आ गये’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली

हे क्षण अलौकिक आहेत, पवित्र आहेत, हे वातावरण, ही ऊर्जा… प्रभू श्रीरामांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. पण २२ जानेवारी २०२४ चा सूर्य अद्भूत तेज घेऊन आला आहे. भूमिपूजनापासून सर्वांना उमंग जाणवत होता, अन् उत्साह वाढतच चालला होता. २२ जानेवारी २०२४ हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आपल्याकडून कुठलीतरी कमतरता राहिली असेल, म्हणून इतकी वर्ष आपण राम मंदिराचा निर्माण करु शकलो नाही, परंतु आता श्रीरामाने आपल्याला माफ केलं असेल” या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.