नवी दिल्ली : प्रधान नरेंद्र मोदी यांची जगात लोकप्रियता वाढत आहे. एका बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर नेत्यांना मागे टाकलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलने व्ह्यूज आणि सब्सक्राइबरच्या बाबतीत भारत आणि जगातील इतर नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मागे टाकले आहे.
पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेलवर 2 कोटी सब्सक्राइबर झाले आहेत. पीएम चॅनलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर अपलोड केलेले व्हिडिओ लोकांना आवडतात. अनेकदा एखाद्या व्हिडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनोरा यांचा दुसरा क्रमांक आहे. त्याच्या चॅनलचे 64 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा क्रमांक लागतो. राहुल गांधी भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राहुल गांधींच्या YouTube चॅनेलचे 2023 मध्ये 22.5 लाख सदस्य झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या चॅनेलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.