Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आलीय. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या मालकांचे कंबरडे मोडेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त एका जाहीर सभेला संबोधित केले. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण होते. यावेळी मोदींनी प्रथम पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि आपले भाषण सुरू केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ वा पती गमावला. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. पण आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आलीय. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या मालकांचे कंबरडे मोडेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला.
त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देणार – पंतप्रधान मोदी
पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आलीय. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या मालकांचे कंबरडे मोडेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे.