Prime Minister : अन्‌‍ भारताच्या पंतप्रधानांनी घातली संत संखाराम महाराजांची मानाची पगडी

Prime Minister : राजकीय नेते, पुढारी किंवा मंत्री म्हटले की राजकारण आणि राजकारण अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात तयार होत असते. त्यांच्या सभोवती सतत शासकीय आणि कार्यकर्त्याचा गराडा असतो. यात साधुसंताची भेट घेणे किंवा त्याच्यासोबत संवाद साधणे ही तर लांबचीच गोष्ट. परंतु या सर्वांना अपवाद ठरले ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने नुकतेच नाशिकला येऊन गेले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द अशा काळाराम मंदिराला भेट दिली होती. यावेळी मोंदी यांनी मंदिरातील संत महात्मे व पूजारी यांची आवर्जून भेट घेतली. या भेटीत अमळनेरचे संत सखाराम महाराजांचीही त्यांनी भेट घेतली. भारताचा पंतप्रधानांसोबतची भेट अविस्मरणीय व्हावी म्हणून त्यांच्या गौरवार्थ संत सखाराम महाराज यांनी त्यांना मानाची पगडी भेट म्हणून दिली. त्याच्या या भेटीचा स्विकार व आदर करत पंतप्रधान मोदी यांनी ती पगडी लगेच डोक्यात घातली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे ही पगडी त्यांनी डोक्यावर ठेवली होती.

 

साधुसंत महात्म्यांप्रती आदर
एरवी भारताच्या पंतप्रधानांना भेट घेण्यासाठी शासकीय प्रोटोकॉल पाळावे लागतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट जनतेत जातात. साधुसंतांबाबत त्यांना कमालीचा आदर असून त्यांना ते खास वेळ देत त्यांच्याशी ते संवाद साधत असल्याचे यातून दिसून येते.

संत सखाराम महाराज यांचा पाय दुखत असल्याने ते अयोध्येला जाणार नव्हते. परंतु नाशिकला पंतप्रधान रेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून ते अयोध्येला जाण्यास तयार झाले. मात्र जायचे कसे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनीच त्यांच्या विमान प्रवासाची व्यवस्था करून दिली आणि संत सखाराम महाराज अयोध्येला रवाना झाले आहेत.