---Advertisement---

Viral Video: मुख्याध्यापकाचा लोचटपणा! शाळेतील वर्गातच महिला शिक्षिकेसोबत रासलीला, व्हिडिओ झाला व्हायरल

---Advertisement---

शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच ज्ञानदान श्रेष्ठ मानले जाते . ज्ञानदानाचे कार्य प्रामुख्याने शाळेतून दिले जाते. त्यामुळे शाळेला पवित्र स्थान म्हटले गेले आहे. मात्र शाळेसारख्या या पवित्र स्थानाला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा रोमान्स समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या लोचट मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.

यासोबतच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर मुख्याध्यापकांसह महिला शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. मुख्याध्यापकांचे शिक्षिकेसोबतच्या वर्तनाबद्दल ई-शिक्षा कोश पोर्टलवर तक्रार करण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार बिहारमधील महुआ येथील एका उच्च माध्यमिक शाळेत घडला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिका अश्लील चाळे करतांना दिसत आहे. यासाठी त्यांनी शाळेतील एका वर्गाचा वापर केला आहे . या वर्गात त्यांनी वर्गात एक बेड टाकलेला आहे. जस या वर्गाचा वापर त्यांनी एक बेडरूम म्हणून केला आहे. हेमंत कुमार असं या मुख्याध्यापकाच नाव आहे.

पुराव्यांसह पोर्टलवर तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कारवाई केली आणि महुआच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर अर्चना कुमारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या शाळेत पोहोचल्या आणि त्यांनी चौकशी सुरू केली तेव्हा शाळेतील सर्व शिक्षकांनी काहीही बोलण्यास नकार दिला. यानंतर शाळेलतील सुरक्षा रक्षकांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की सदरील वर्गाच्या चाव्या त्यांच्याकडे नसून मुख्याध्यापकांकडे असतात. या वर्गाची तपासणी केली असता यात एक बेड आढळून आला त्यामुळे मुख्याध्यापकांचे घबाड उघडे पडले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शशी रंजन यांनी मुख्याध्यापकांवर शाळेचे वातावरण बिघडवल्याबद्दल त्यांना निलंबित केले. यासोबतच, महिला शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment