---Advertisement---

रिंकू सिंगने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना आले ‘आनंदाश्रू’

---Advertisement---

Rinku Singh-Priya engagement : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा झाला. रिंकू सिंगने प्रिया सरोज यांना अंगठी घालताच त्यांना आनंदाश्रू आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील हॉटेल ताजमध्ये रिंकू आणि प्रियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे.

सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि पत्नी डिंपल यादव, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, जया बच्चन, टीम इंडियाचे माजी खेळाडू प्रवीण कुमार, पियुष चावला, यूपी रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल या समारंभात उपस्थित होते.

रिंग सेरेमनीमध्ये रिंकू सिंगने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर प्रिया सरोज गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये होती. स्टेजवर पोहोचताच सपा खासदार भावुक झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, रिंकू सिंगने तिचे सांत्वन केले. त्यानंतर दोघेही हसतमुखाने पोज दिली.

अंगठी समारंभासाठी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांनी एकमेकांसाठी खास अंगठ्या ऑर्डर केल्या होत्या. सपा खासदाराने कोलकाता येथून डिझायनर अंगठी खरेदी केली होती तर रिंकू सिंग यांनी मुंबईहून खास अंगठी ऑर्डर केली होती. दोन्ही अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामध्ये युरोपियन ते चायनीज, अशा विविध पदार्थांचा समावेश होता. प्रियाने तिचा आवडता बंगाली रसगुल्ला आणि काजू पनीर रोल समाविष्ट केला होता. तर स्टार क्रिकेटरचा आवडता पदार्थ पनीर टिक्का आणि मटर मलाई यांचा मेनूमध्ये समावेश होता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment